आहरण व संवितरण अधिकारऱ्यांनी डी.सी.पी.एस अधिकारी/कर्मचाऱ्यांचे एस-1 फॉर्म भरून कोषागारास सादर केले होते परंतु काही तांत्रिक कारणाने ते फॉर्म रिजेक्ट झााले असून रिजेक्ट झाालेले कर्मचाऱ्यांचे एस-1/सी.एस.आर.एफ फॉर्म नमुन्यात पुन्हा भरुन दि. 24-06-2016 पर्यंत कोषागारास सादर करावेत.व तसेच 31/03/2015 पूर्वी किंवा नंतर रुजू झालेल्या डि.सी.पी.एस कर्मचाऱ्यांचे अदयापर्यंत सादर केले नसतील तर ते ही एस-1/सी.एस.आर.एफ फॉर्म नमुन्यात सादर करावेत.फॉर्म-2 म्हणजेच आर-2 शेडयूल वर प्रान क्रमांक असल्याची खात्री करावी.सदरील कर्मचाऱ्यांचे एस-1/सी.एस.आर.एफ फॉर्म न सादर केल्यास पगार देयके तयार होणार नाही त्या संदर्भातील सुचना सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध आहे. तसेच वरील माहिती कोषागारात सादर न केल्यास देयके स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.